शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

धक्कादायक! प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवल्याच्या रागातून शिक्षकाचा गळा चिरला

By पूनम अपराज | Published: October 17, 2020 2:55 PM

France Teacher Beheaded : या गोळीबारात आरोपीचा खात्मा करण्यात आला. या प्रकरणाची दहशतवादी घटनेशी संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, शिक्षकाने मुस्लिम विद्यार्थ्यांना व्यंगचित्र दाखविण्यापूर्वी वर्गबाहेर जाण्यास सांगून "वादंग" निर्माण केला होता.

पॅरिस - पॅरिस नुकतेच आपल्या विद्यार्थ्यांना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाची शाळेच्या बाहेर त्याचा शिरच्छेद करण्यात आला. राष्ट्रपति इमैनुएल मैक्रॉन यांनी याला इस्लामिक दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटले आहे. शिक्षकाचा गळा चिरणाऱ्या आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनीगोळीबार केला. पोलिसांच्या या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाचा एकाने गळा चिरला. या हत्येची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात आरोपीचा खात्मा करण्यात आला. या प्रकरणाची दहशतवादी घटनेशी संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे.२०१५ मध्ये फ्रान्समध्येही इस्लामिक हल्ले झाले होते२०१५ मध्ये फ्रान्समधील वादग्रस्त व्यंगचित्र मासिक ''शार्ली ऐब्दो' आणि राजधानीतील यहूदी सुपरमार्केटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपासून इस्लामिक हिंसाचाराची लाट काही प्रमाणात दिसून येत आहे. या हल्ल्यातील हत्येचा संबंध 'दहशतवादी संघटने'शी जोडला आहे का हे फ्रेंच अँटी टेरर प्रॉसिक्यूटर तपासून पाहत आहे.ही घटना फ्रेंच राजधानीपासून 30 किमी अंतरावर घडली

फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून 30 किलोमीटर (२० मैल) अंतरावर कॉन्फ्लॅन्स सेंट-होनोरिनच्या वायव्य उपनगरातील एका मध्यम शाळेच्या बाहेर हा हल्ला झाला. शाळेजवळील संशयिताचा फोन आल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिसांना तेथे शिक्षकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला शोधून काढण्यात आलं. त्यावेळी त्याच्या हातात ब्लेड होतं. पोलिसांना आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धमकावले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी गोळीबार केला आणि त्याला गंभीर जखमी केले. पण नंतर त्याचा मृत्यू झाला. सूत्रांनी सांगितले की, एका अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. हे सर्व हल्लेखोराशी संबंधित होते.शिक्षक शिकवत होते अभिव्यक्ति स्वतंत्रताया हल्ल्यात ठार झालेल्या शिक्षक इतिहास शिकवत होते. शाळेतील मुलांबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर चर्चा करताना शिक्षकाने प्रेषित मोहम्मद यांची व्यंगचित्रं दाखविली. शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, शिक्षकाने मुस्लिम विद्यार्थ्यांना व्यंगचित्र दाखविण्यापूर्वी वर्गबाहेर जाण्यास सांगून "वादंग" निर्माण केला होता.चारजण ताब्यातपोलिसांनी या घटनेनंतर एका अल्पवयीन मुलासह चारजणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे हल्लेखोर आरोपीशी संबंधित आहेत. पोलिसांनी या चौघांची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकाची हत्या केल्यानंतर आरोपीला पळून जाण्यास त्यांनी मदत केली असल्याचा आरोप आहे.इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैंगबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर सात जानेवारी २०१५ रोजी चार्ली हेब्दोच्या पॅरिसच्या येथील कार्यालयावर दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये १२ जण ठार झाले होते. या हल्ल्यात फ्रान्समधील काही दिग्गज व्यंगचित्रकारही ठार झाले होते. चार्ली हेब्दोच्या मुखपृष्ठावर अनेक व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले होते. यामध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचाही समावेश होता. हे व्यंगचित्र जीन काबूट यांनी काढले होते. २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. साप्ताहिकाच्या कार्यालयावर सात जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात संपादकांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरात हे साप्ताहिक पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर त्या साप्ताहिकाचा खप १० हजार प्रतींवरून थेट दोन लाख प्रतींवर पोहोचला होता.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसFiringगोळीबारArrestअटक