शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

धक्कादायक प्रकार! गाय चोरीच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण अन् टेम्पो दिला पेटवून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:52 IST

Crime News : टिटवाळा पोलिसांनी केली तीन जणांना अटक; अन्य आरोपींचा शोध सुरु

ठळक मुद्देया प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी काही तासाच तीन जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींच्या पोलिस शोधात आहे.टेम्पो चालक जनावरे चोरत असल्याच्या संशय काही नागरीकांना होता.

कल्याण नजीक खडवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाय चोरीच्या संशयावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करीत तरुणाचा टेम्पो पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी काही तासाच तीन जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींच्या पोलिस शोधात आहे.खडवली परिसरातील दानबाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या काही तरुणांनी एका टेम्पो चालकास हटकले. त्याला विचारपूस केली. टेम्पो चालक जनावरे चोरत असल्याच्या संशय काही नागरीकांना होता. चर्चे दरम्यान वाद सुरु झाला. या वादात नागरीकांनी टेम्पो चालकास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणी दरम्यान टेम्पो पेटवून देण्यात आला. सोमवारी रात्री ही घटना घडली होती. घटना घडल्यानंतर याची माहिती टिटवाळा पोलिसांना मिळाली.

टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत. एक पथक तयार केले. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. काही तासाच पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता हे तिघे या प्रकरणात सामिल असल्याचे समोर आले. या प्रकरणी संतोष शेलके, काळूराम पवार अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. या बाबत वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांचे म्हणणो आहे की, पिडीत व्यक्ती हा शहापूर तालुक्यातील हाल गावचा आहे. मासे पकडण्यासाठी तो या परिसरात आल्याचे त्याने सांगितले होते. काही लोकांना संशय होते. तो जनावरे चोरी करण्यास आला आहे. या संशयावरुन हा प्रकार घडला आहे. तिघांना अटक करुन अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणPoliceपोलिसArrestअटकcowगाय