पानिपत - पानिपत येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका निर्दयी आजीने तिच्या स्वत: च्या सहा महिन्यांच्या नातीला जमिनीवर आपटून ठार मारले आहे. निष्पाप चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी महिलेच्या शोधात पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.हे प्रकरण पती-पत्नीमधील भांडणाशी संबंधित होते. सनोली कसबे शहरातील राणा माजरा गावात ही वृद्ध महिला आपल्या मुलीकडे आली. आपल्या मुलीसाठी नवीन फोन घेण्याच्या मुद्द्यावरून जावयाशी वाद झाला. जेव्हा हा वाद इतका शिगेला पोचला ती विवाहित मुलगी आपल्या आपल्या सहा महिन्याच्या मुलीला घेऊन माहेरी निघाली. पत्नी व मुलीला मामाकडे नेल्याबद्दल पतीने आक्षेप घेतला. या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
धक्कादायक!...म्हणून सहा महिन्याच्या नातीचा आजीने जमिनीवर आपटून घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 14:05 IST
आरोपी महिलेच्या शोधात पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.
धक्कादायक!...म्हणून सहा महिन्याच्या नातीचा आजीने जमिनीवर आपटून घेतला जीव
ठळक मुद्दे हे प्रकरण पती-पत्नीमधील भांडणाशी संबंधित होते. या प्रकरणात सनोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.