शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ...म्हणून वडिलांनी तब्बल 17 दिवस डीप फ्रीजरमध्ये ठेवला मुलाचा मृतदेह; सांगितलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 22:04 IST

Crime News : वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत होती.

ठळक मुद्देशिवांगच्या मृत्यू प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली नाही, एवढंच नाही तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्टही देण्यात आलेला नाही.शिवांक बेशुद्ध झाला आहे. त्याचं शरीर पिवळे पडले आहे. ते तिथं पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं, यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सुलतानपूर - दिल्लीत काही दिवसांपूर्वी शिवांक पाठक (३२) या तरुणाचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. तो उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील राहणारा होता. शिवांकच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी तब्बल १७ दिवस त्याचा मृतदेह डीप फ्रीजरमध्ये प्रिझर्व करून घरातच ठेवला होता. त्याच्या त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. मात्र, जेव्हा ते पोलीस ठाण्यात गेले तेव्हा कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या सर्व प्रकारानंतर तरुणाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल करीत एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे, असं वडिलांचं म्हणणं आहे. 

शिव प्रसाद पाठक लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोठा मुलगा शिवांक २०१२ मध्ये दिल्लीला गेला होता. तेथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होता. यादरम्यान त्याने एका अन्य व्यक्तीसोबत मिळून एक कंपनी सुरू केली. कंपनीत एचआर म्हणून नोकरी करीत असलेल्या तरुणीसोबत शिवांक मे २०१३ मध्ये लग्न केलं.

वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत होती.१९ जुलै २०२१ रोजी शिवांक आपला लहान भाऊ इशांकला फोन करुन आपल्या जीवाचं काहीतरी बरंवाईट होण्याबाबत भीती व्यक्त केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, त्याची हत्या केली जाऊ शकते किंवा कोणत्या गुन्हेगारीत अडकवलं जाऊ शकतं. या फोनवरील संवादाचं रेकॉर्डिंग इशांकच्या मोबाइलमध्ये आहे.

रेल्वेत नोकरी करणारा इशांक लखऊनमध्ये तैनात आहे. तो म्हणाला की, शिवांकची पत्नी गुलरीन कौरने दिल्लीतील मोतीनगर भागात राहणारी माझी बहीण पुनम मिश्रा हिला फोन करुन सांगितलं की, शिवांक बेशुद्ध झाला आहे. त्याचं शरीर पिवळे पडले आहे. ते तिथं पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं, यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

शिवांगच्या वडिलांनी सांगितलं की, १ ऑगस्ट रोजी त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. हा मृत्यू संशयास्पद आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत हे प्रकरण पोलिसात दाखल केलं जात नाही, तोपर्यंत ते मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही. शिवांगच्या मृत्यू प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली नाही, एवढंच नाही तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्टही देण्यात आलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस