धक्कादायक! अमरावतीच्या निवासी मदरस्यात मुलीचे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 20:57 IST2019-11-04T20:15:24+5:302019-11-04T20:57:00+5:30
प्रमुखानेच केला अत्याचार; मुफ्ती जिया उल्ला खान याच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! अमरावतीच्या निवासी मदरस्यात मुलीचे लैंगिक शोषण
अमरावती - लालखडीस्थित जामेआनगरातील जामेआ इस्लामिया बुस्ताने फातेमा लिलबनात या मदरस्यात प्रमुखानेच एका १६ वर्षीय मुलीवर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना नागपुरी गेट पोलिसांत सोमवारी तक्रार झाल्यानंतर उघडकीस आली. या घटनेमुळे मुस्लिम बांधवांत संताप व्यक्त करण्यात आला असून, शहरात खळबळ उडाली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील १६ वर्षीय मुस्लिम मुलगी लालखडी परिसरातील निवासी मदरसा येथे १ ऑगस्ट २०१९ रोजी शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली. २४ सप्टेंबर रोजी १६ वर्षीय मुलीला मदरसा प्रमुख मुफ्ती जिया उल्ला खान यांनी एका खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मदरस्यातील फिरदोस नावाच्या एका महिलेने मुलीला मुफ्ती जिया उल्ला खान याच्या स्वाधीन केले होते.