धक्कादायक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 09:48 PM2019-09-22T21:48:34+5:302019-09-22T21:51:33+5:30

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल

Shocking! Seven-year-old child has sexually assaulted | धक्कादायक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्दे आजीला संशय आल्याने आजीने तिला याबाबत खोदून विचारले. पोलिसांनी विक्रम पुरोहित (१९), नवीन जसुजा (२४), अजय दोहारे (३४) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण - कल्याण पश्चिमेकडील परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. सात वर्षाच्या चिमुकलीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी विक्रम पुरोहित (१९), नवीन जसुजा (२४), अजय दोहारे (३४) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
पिडीत मुलगी पहिलीच्या वर्गात शिकते. पालकांनी या मुलीला शाळेत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी रिक्षा ठरवून दिली होती.शाळा सुटल्यानंतर ही चिमुरडी शाळेबाहेर रिक्षाची वाट पाहत थांबायची हीच संधी साधत शाळेसमोर दुकाने थाटून बसलेल्या विक्रम, नवीन आणि अजय यांनी या चिमुरडीची ओळख काढत तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत शाळेसमोर असलेल्या मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करत असत रिक्षाचालक तिला परत नेण्यासाठी येण्यापूर्वीच ते तिला परत शाळेबाहेर आणून सोडत असल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. हीच संधी साधत नराधम आरोप मागील अनेक महिन्यापासून या चिमुरडीवर वारंवार सामूहिक अत्याचार करत होते. मात्र, या चिमुरडीच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागल्याने आजीला संशय आल्याने आजीने तिला याबाबत खोदून विचारले. त्यावेळी तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले. नंतर पीडित चिमुरडीच्या पालकांनी या तीन नराधमांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Web Title: Shocking! Seven-year-old child has sexually assaulted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.