धक्कादायक! आरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 20:56 IST2019-10-31T20:41:59+5:302019-10-31T20:56:19+5:30
आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

धक्कादायक! आरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
पनवेल - तळोजा येथील आरपीएफ केंद्रात राहणाऱ्या जवानाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली. सुनील भोये (३२) असे या जवानाचे नाव आहे. मात्र, आत्महत्येच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
तळोजा येथे पापडीचा पाडा गावाजवळ आरपीएफचे १०२ बटालियन आहे. शिपाई पदावर काम करणारा सुनिल देहू भोये हा तरूण कुटूंबियांसमवेत इथल्या वसाहतीत राहत होता. गुरूवारी पहाटे साडेपाच वाजता सुनिलने राहत्या घरात पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नीला पहाटे जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कौटुबिक नैराश्येतून हा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तळोजा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.