शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक खुलासा! आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी होती दोन महिन्यांची गरोदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 21:20 IST

Suicide Case : युवकावर पॉक्सोचा गुन्हा; मेढ्यातील घटनेला नवे वळण

सातारा : बिहारमधील एका अल्पवयीन मुलीने मेढ्यात केलेल्या आत्महत्येला वेगळे वळण लागले असून पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी एका बावीस वर्षीय युवकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महंमद आझाद जासीम (वय २२, रा. बिहार) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारमधील एक कुटुंब मेढा येथे वास्तव्याला आले आहे. या कुटुंबातील लोक एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करत आहेत. या कुटुंबातील एका १७ वर्षांच्या मुलीने सोमवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मेढा पोलिसांनी तिच्या आत्महत्येबाबत सखोल तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. पीडित मुलीला महंमद या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून मेढ्यात आणले होते. ती अल्पवयीन असतानाही तिच्याशी त्याने लग्न केले. लग्नानंतर तिच्याशी नेहमी तो वाद घालत होता. या वादातूनच तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी महमंद जासीम याच्यावर अत्याचार व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसBiharबिहारArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा