शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

धक्कादायक! फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक आरोपीकडून सहकारी आरोपी पत्नीची हत्या केल्याचे उघड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 21:39 IST

Murder : पोलिसांना तांत्रिक माहितीवरून आरोपी गुजरातच्या सुरत भागात असल्याचे समल्यावर पोलिसांनी तडक गुजरात गाठले व ११ ऑक्टोबर रोजी आशिष उकानी ह्याला अटक केली. तो सुरतच्या मोटा वराचा भागातील हरिकृष्ण इमारतीत रहात होता .

ठळक मुद्देआशीषने पत्नीची हत्या केल्याचे कळताच पोलिसांनी तडक घटनास्थळ गाठले . स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने निकटीचा मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा केला .

मीरारोड - स्वाईप यंत्र वापरातील इन्व्हॉईस बेस्ड पद्धतीचा वापर करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना अटक आरोपी कडून गुन्ह्यातील सह आरोपी पत्नीचा गुजरात मध्ये गेल्या वर्षी विहरीत ढकलून हत्या केल्याचा आणि मग मृतदेह शेतात पुरल्याचा धक्कादायक प्रकार काशिमीरा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणला आहे .ट्रान्समार्ट डिजिटल कंपनीचे ललित शेठे यांनी १५ डिसेंबर २०१९ मध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार काशिमीरा पोलिसांनी मैत्रीण ऑनलाईन कंपनीचे संचालक आशिष उकानी ( ३५ ) व त्याची दुसरी पत्नी निकिता कीर्तिकुमार दोषी उर्फ निकिता आशिष उकानी ( ३४ ) ह्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता . शेठे यांच्या कंपनीने उकाणी यांच्या कंपनीस ४ स्वाईप यंत्रे दिली होती . शेठे यांच्या कंपनीने दिलेल्या त्या एका क्रेडिट कार्ड मशीनचा इन्व्हॉईस बेस्ड पद्धतीचा वापर केला .त्या आधारे शोभित कुमार यांच्या क्रेडिट कार्डद्वारे २९ हजार रुपयांची मर्यादा असताना तब्बल १५ लाख ६५ हजार ९०० रुपये इतक्या स्कमेचा अपहार केला . ट्रान्समार्टला त्यांच्याशी संलग्न बँकेतून काढलेली रक्कम कळण्यास बँकेकडून कळवण्यात होणाऱ्या तांत्रिक विलंबाचा ते गैरफायदा घेत असत. सुरतमध्ये देखील आशिष याने २ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे .काशिमीरा पोलीस त्यांच्या कडे दाखल सदर गुन्ह्या प्रकरणी आशिष व निकिताचा शोध घेत होते. परंतु आरोपी वारंवार त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांना शोध लागत नव्हता. पोलिस आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलीस आयुक्त एस.जयकुमार, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर , सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप ह्यांच्या मार्गदर्शना खाली काशिमीराचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व सुदर्शन पोतदार तसेच पोलीस कर्मचारी राहुल दाभाडे, संतोष तायडे, स्वप्नील मोहिले आदींनी तपास चालवला. पोलिसांना तांत्रिक माहितीवरून आरोपी गुजरातच्या सुरत भागात असल्याचे समल्यावर पोलिसांनी तडक गुजरात गाठले व ११ ऑक्टोबर रोजी आशिष उकानी ह्याला अटक केली. तो सुरतच्या मोटा वराचा भागातील हरिकृष्ण इमारतीत रहात होता .पोलिसांनी त्याच्या कडे सहआरोपी असलेली त्याची पत्नी निकिता बाबत कसून चौकशी केली असता सुरवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता . पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच अखेर त्याने तोंड उघडले आणि ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला . आशिषने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले . १५ सप्टेंबर २०१९ मध्ये तो निकिताला घेऊन सुरतच्या वेलेंजा येथे महिनाभर राहिला . तेथून त्याने अमरेली ह्या मूळगावी निकिताला नेले. १५ ऑक्टोबरच्या पहाटे तो तिला घेऊन सेलना येथील एका शेतात गेला . तेथे सकाळ पर्यंत दारू प्यायला . गाडी व पैसे हे निकिताचे असल्याने त्यावरून दोघां मध्ये भांडण झाले आणि आशिषने निकिताला तेथील विहरीत ढकलून मारून टाकले . नंतर रश्शी आणून ती निकिताच्या मृतदेहास बांधली आणि गाडीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. शेतातच खड्डा करून त्यात मीठ टाकून मृतदेह पुरून टाकला .आशीषने पत्नीची हत्या केल्याचे कळताच पोलिसांनी तडक घटनास्थळ गाठले . स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने निकटीचा मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा केला . चंदनकर यांनीच अमरेलीच्या वंडा पोलीस ठाण्यात सरकार तर्फे फिर्याद देऊन तेथे निकिताच्या खुनाचा गुन्हा दाखल केला . आशीषची पहिली पत्नी असून निकिता हि दुसरी पत्नी होती . आरोपीला फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून काशिमीरा पोलीस तपास करत आहेत.  

टॅग्स :Murderखूनmira roadमीरा रोडPoliceपोलिसArrestअटक