धक्कादायक...व्हेंटिलेटरवर असणाऱ्या प्रेग्नंट महिलेवर वॉर्डबॉयकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:24 IST2019-09-01T15:24:26+5:302019-09-01T15:24:52+5:30

हैदराबादच्या या खासगी हॉस्पिटलमध्ये ही 30 वर्षीय महिला प्रसुतीसाठी आली होती.

Shocking ... Pregnant woman abducted by a wardboy on a ventilator | धक्कादायक...व्हेंटिलेटरवर असणाऱ्या प्रेग्नंट महिलेवर वॉर्डबॉयकडून अत्याचार

धक्कादायक...व्हेंटिलेटरवर असणाऱ्या प्रेग्नंट महिलेवर वॉर्डबॉयकडून अत्याचार

तेलंगानाच्या राजधानीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झाला आहे. येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयवर एका महिलने अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला प्रसुतीसाठी येथे आली होती. या काळात हा लाजिरवाना प्रकार घडला आहे. 


हैदराबादच्या या खासगी हॉस्पिटलमध्ये ही 30 वर्षीय महिला प्रसुतीसाठी आली होती. उपचारावेळी तिची प्रकृती खालवल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यावेळी या वॉर्डमध्ये ड्युटीवर असलेला अच्युत राव (50) या वॉर्डबॉयने महिलेसोबत छेडछाड केली. 



महिलेने याबाबतची माहिती पतीला दिली. यानंतर वॉर्डबॉयविरोधात बंजारा हिल्स पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस अधिकारी कलिंग राव यांनी वॉर्डबॉयवर आयपीसी 354 अंतर्गत गुव्हा दाखल करत ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

Web Title: Shocking ... Pregnant woman abducted by a wardboy on a ventilator