धक्कादायक ! महिला पोलिसाच्या विनयभंगाप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या
By पूनम अपराज | Updated: April 16, 2019 23:15 IST2019-04-16T23:13:35+5:302019-04-16T23:15:06+5:30
महिला शिपायाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

धक्कादायक ! महिला पोलिसाच्या विनयभंगाप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या
मुंबई - 24 वर्षीय महिला शिपायाच्या विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक विनोद बल्लाळ (38) याला आझाद मैदान पोलिसांनीअटक केली. आरोपी पोलीस श्वानपथक कार्यालयात प्रभारी असताना पीडित शिपायाशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.
पोलीस आयुक्तालयाबाजूला असलेल्या श्वान पथक कार्यालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी बल्लाळ यांच्याविरोधात भां. द. वि. कलम 354(अ), 354(ड) अंतर्गत आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काल आरोपी पोलिसालाअटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे. ते घाटकोपर येथील रहिवासी आहे. बल्लाळ हे श्वान पथक कार्यालयात प्रभारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी तक्रारदार महिला पोलिसाला आरोपीने विविध बहाण्याने बोलावून अश्लील स्पर्श केला असल्याचा महिला पोलिसाचा आरोप आहे. याबाबत
तक्रारदार महिला पोलीस शिपायाची तात्काळ फिर्याद नोंदवून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काल बल्लाळला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.