शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

धक्कादायक! ७ मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून वृद्धेचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 18:30 IST

An old man fell from the terrace : बोरिवली संक्रमण शिबिर येथील प्रकार

ठळक मुद्देयाप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधीक चौकशी सुरू आहे.खासगी कंपनीत अंकुश नोकरी करतो. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आणि सिंह हे दोघेच याठिकाणी राहत होते. त्याची आई मानसिक रुग्ण होती आणि जिच्यावर उपचार सुरू होते.

मुंबई: सात मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून माया जयशंकर सिंह (६१) या महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे हा प्रकार बोरिवलीच्या संक्रमण शिबीर इमारतीत घडला. त्या मानसिक रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरू होते असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानुसार याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधीक चौकशी सुरू आहे.सिंह या मुलगा अंकुश (३१) याच्या सोबत संक्रमण शिबिरात गुलमोहर या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत होत्या. मंगळवारी सकाळी त्या इमारत परिसरात जखमी अवस्थेत स्थानिकाना दिसल्या. त्यानुसार त्यांनी याबाबत पोलिसांना व अंकुशला कळविले. कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना कांदिवलीच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. जीथे डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केले. खासगी कंपनीत अंकुश नोकरी करतो. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आणि सिंह हे दोघेच याठिकाणी राहत होते. त्याची आई मानसिक रुग्ण होती आणि जिच्यावर उपचार सुरू होते.

महिनाभरापूर्वी सिंह यांना शिव रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र अचानक घरातून त्या निघून जायच्या आणि परत यायच्या. 'मंगळवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे घराबाहेर कोणीच नव्हते. परिणामी त्या पडल्याचे कोणी पाहिले नाही. तसेच संक्रमण शिबिर असल्याने आसपास सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. मात्र सिंह यांची वैद्यकीय कागदपत्रे पडताळून पाहण्यात आली असून अद्याप तरी यात काही संशयीत बाब आढळलेली नाही, त्यानुसार याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे', अशी माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई