धक्कादायक! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये NRI महिलेचा लैंगिक छळ; कंपनीच्या सीईओवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:53 IST2024-01-15T16:51:19+5:302024-01-15T16:53:45+5:30
महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एका खासगी कंपनीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये NRI महिलेचा लैंगिक छळ; कंपनीच्या सीईओवर गुन्हा दाखल
नवी दिल्ली : दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एनआरआय महिलेचा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लैंगिक छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सदरील महिला काम करत असलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ भारतीय असलेल्या आणि अमेरिकन नागरिकत्व असलेल्या महिलेने शनिवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे एका खासगी कंपनीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये १३ सप्टेंबर २०२३ रोजी माझ्यावर सदर अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा पीडित महिलेचा दावा आहे.
महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, मी ज्या खासगी कंपनीत सहाय्यक महाप्रबंधक म्हणून काम करते त्याच कंपनीत आरोपी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे. तो माझ्या एका नातेवाईकाच्या परिचयातील असून मला नोकरी मिळवून देण्यात त्याने मदत केली होती. मात्र १३ सप्टेंबर रोजी त्याने मला हॉटेलमध्ये नेत माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.