धक्कादायक! मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 20:25 IST2018-11-19T20:23:51+5:302018-11-19T20:25:10+5:30

याच परिसरात राहणाऱ्या सुरेश वर्मा (वय ३२), सुरेंद्र वर्मा(वय २५), शिवकुमार वर्मा (वय २१), मोहन पांडे (वय २१) अशी आरोपींची नावे असून विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३०२,३२३,२४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. यातील मृत तरुण राहुल याच्यावर चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 

Shocking The murder of the youth on the theft of mobile theft | धक्कादायक! मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या 

धक्कादायक! मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या 

ठळक मुद्देराहुल चंद्रकांत पांचाळ (वय १९)  रहाणार चंदन नगर, सूर्यनगर विक्रोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. एका मोबाईल चोरी प्रकरणात आरोपींनी राहुलकडे विचारणा केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत या चार आरोपींनी राहुलला बेदम मारहाण केलीया प्रकरणी पोलिसांनी सुरेश, सुरेंद्र आणि मोहन या तिघांना तात्काळ अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.

विक्रोळी - मोबाईल चोरी केल्याच्या संशयावरून विक्रोळी पार्कसाईट परिसरात एका तरुणाची चार जणांनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे. ही घटना काल घडली आहे. राहुल चंद्रकांत पांचाळ (वय १९)  रहाणार चंदन नगर, सूर्यनगर विक्रोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. याच परिसरात राहणाऱ्या सुरेश वर्मा (वय ३२), सुरेंद्र वर्मा(वय २५), शिवकुमार वर्मा (वय २१), मोहन पांडे (वय २१) अशी आरोपींची नावे असून विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३०२,३२३,२४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. यातील मृत तरुण राहुल याच्यावर चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 

यावरूनच एका मोबाईल चोरी प्रकरणात आरोपींनी राहुलकडे विचारणा केली. यावेळी झालेल्या बाचाबाचीत या चार आरोपींनी राहुलला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुद्ध झाला. त्याला पालिकेचा महात्मा फुले रुग्णालयात उपचारास दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश, सुरेंद्र आणि मोहन या तिघांना तात्काळ अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर यातील आणखी एक आरोपी शिवकुमार वर्मा याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Shocking The murder of the youth on the theft of mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.