शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 19:16 IST

Murder : गुरूवारी रात्री नऊच्या दरम्यान  भररस्त्यावर मोठ्या प्रमाणात  वाहनांची ये- जा चालू असताना  सदर घटना घडली असून महिन्यातील दुसऱ्या घटनेमुळे नांदेड परीसरात दहशदीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनांदेड फाट्याजवळ किर्ती हॉटेल समोर आरोपींची पान टपरी आहे. टपरीच्या उधारीवरून मृत अजय आणि आरोपींमध्ये भांडण असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

पुणे : पूर्ववैमनस्यातून सिंहगड रस्त्यावर नांदेड फाटा येथे पाच जणांनी हल्ला कोयता, लोखंडी रॉड यांनी केलेल्या हल्ल्यात तरुणाचा खून झाला आहे. अजय शिवाजी शिंदे( वय २६, रा. जाधव नगर,गोसावी वस्ती नांदेड, ता. हवेली)  असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.  

गुरूवारी रात्री नऊच्या दरम्यान  भररस्त्यावर मोठ्या प्रमाणात  वाहनांची ये- जा चालू असताना  सदर घटना घडली असून महिन्यातील दुसऱ्या घटनेमुळे नांदेड परीसरात दहशदीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृताचा मावसभाऊ राकेश तुलशीराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. राहुल सपकाळ, रोहीत सपकाळ, दुर्गेश उर्फ दुर्ग्या, सुधीर उर्फ  सुध्या, पृथ्वी उर्फ चिराग( सर्व राहणार नांदेड ता.हवेली) अशी आरोपींची नावे असून सर्व फरार आहेत.   

नांदेड फाट्याजवळ किर्ती हॉटेल समोर आरोपींची पान टपरी आहे. टपरीच्या उधारीवरून मृत अजय आणि आरोपींमध्ये भांडण असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याचे पोलीसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच  हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशीव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार संजय शेंडगे, पोलीस नाईक दिनेश  कोळेकर, पोलीस कर्मचारी संतोष भापकर,  राजेंद्र मुंडे,महेंद्र चौधरी, पोलीस मित्र सुदीप पोळ होमगार्ड सह घटनास्थळी दाखल झाले. हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. हवेली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करत आहेत.

 

टॅग्स :MurderखूनPuneपुणेPoliceपोलिस