धक्कादायक! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:29 PM2019-11-13T15:29:25+5:302019-11-13T15:32:51+5:30

हत्या करून जाळला मृतदेह 

Shocking! Murder of a young girl who was in leave in relationship | धक्कादायक! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीची हत्या 

धक्कादायक! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीची हत्या 

Next
ठळक मुद्दे अटक आरोपीचे नाव नीरज मौर्या (२०) असं आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. रागाच्या भरात मोहिनीचा स्कार्फने गळा आवळून तिला ठार मारले

ठाणे - कल्याण येथील बल्याणी टेकडीवर रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अज्ञात २५ ते ३० वयोगटातील महिलेचा मृतदेह सापडला होता. १ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हा मृतदेह सापडला असून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने हत्या केलेल्या महिलेचा मृतदेह पेटवून देण्यात आला होता. या मृतदेहाबाबत बाल्याणी येथे राहणाऱ्या अकील अहमद शहा (३१) यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. अटक आरोपीचे नाव नीरज मौर्या (२०) असं आहे. 

आरोपी नीरज हा बल्याणी येथील गायकवाड चाळीत राहणार असून त्याचे २ महिन्यांपासून मैत्रीण मोहिनी नथ्थुराम गुप्ता (१९) हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. मोहिनी हि उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील होती. गेल्या ८ ते १० दिवसांपासून मोहिनी नीरजसोबत दिसून येत नसल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर नीरजला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने मोहिनीसोबत वारंवार भांडण होत असल्याने त्याने रागाच्या भरात मोहिनीचा स्कार्फने गळा आवळून तिला ठार मारले आणि तिचे प्रेत घरात असलेल्या प्लास्टिक गोणीमध्ये भरून ते प्रेत बल्याणी टेकडीवर असलेल्या  कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेवून टाकले. तेथे रॉकेल टाकून मृतदेह जाळला असल्याची कबुली नीरजने पोलिसांना दिली. पोलिसांनी नीरजला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठविण्यात आली आहे. 

Web Title: Shocking! Murder of a young girl who was in leave in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.