धक्कादायक! कॅन्सरला कंटाळून गळफास घेऊन आई आणि मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 16:15 IST2018-12-27T16:13:03+5:302018-12-27T16:15:14+5:30
मृत सुरज सिंग याला कॅन्सरचा आजार असल्यामुळे आजारपणाला कंटाळून त्याने आईसह आत्महत्या केल्याचे रबाळे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळत आहे.

धक्कादायक! कॅन्सरला कंटाळून गळफास घेऊन आई आणि मुलाची आत्महत्या
नवी मुंबई - गोठीवली परिसरात आज धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी आई आणि मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मृत आईचं नाव रेखा सिंग (वय ५८) आणि तिच्या मुलाचे नाव सुरज सिंग (वय ३५) असं आहे. रेखा सिंगने सिलींग फॅनला गळफास घेत तर सुरजने सिलींगला गळफास घेवून आपला जीव संपवला आहे. याप्रकरणी राबळे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुरज सिंग याला कॅन्सरचा आजार असल्यामुळे आजारपणाला कंटाळून त्याने आईसह आत्महत्या केल्याचे रबाळे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळत आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदानासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
गोठीवली परिसरात आज धक्कादायक घटना घडली आहे. एकाच वेळी आई आणि मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 27, 2018