धक्कादायक! अल्पवयीन, अविवाहित मुलीचा गर्भपात?; पालघर पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 17:03 IST2019-04-09T17:02:55+5:302019-04-09T17:03:26+5:30
अल्पवयीन मुलीच्या वयाचा दाखला व पुरावे पोलीस जमवत आहेत.

धक्कादायक! अल्पवयीन, अविवाहित मुलीचा गर्भपात?; पालघर पोलीस ठाण्यात तक्रार
पालघर - एका खासगी नर्सिग होममध्ये एका अल्पवयीन, अविवाहित मुलीचा गर्भपात करण्यात आला असून याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत तपासणी करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात गर्भाचे नमुने पाठवण्यात आले असून या अल्पवयीन मुलीच्या वयाचा दाखला व पुरावे पोलीस जमवत आहेत.
पालघर येथील एका खासगी नर्सिग होममध्ये ५ एप्रिल रोजी एका गरोदर मुलीला रक्तस्राव होत आल्याने उपचार करण्यासाठी दाखल केले. या महिलेने मुदतपूर्व अर्भकाला जन्म दिला आणि ते काही वेळातच मृत झाले. या महिलेचा गर्भपात केला असल्याची तक्रार पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. या तरुणीचे वय १९ वर्षे असल्याचे तिच्या पालकांनी डॉक्टरांना सांगितले. मात्र ही तरुणी अल्पवयीन आणि अविवाहित असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झाली आहे. त्यांनी पालघर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्य़ाची नोंद केली.