Shocking! A minor girl who lives in remand home got pregnant | धक्कादायक! अल्पवयीन मुलगी रिमांड होममध्ये राहिली गर्भवती 
धक्कादायक! अल्पवयीन मुलगी रिमांड होममध्ये राहिली गर्भवती 

ठळक मुद्देही घटना अल्पवयीन मुलगी (१६ वर्षीय) गरोदर राहिल्याचे कळल्यावर उजेडात आली. याप्रकरणी बेतिया राजकीय रेल्वे ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आला आहे.  अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत. 

बेतिया - अल्पवयीन मुलगी रिमांड होममध्ये झाली गर्भवती झाल्याने पाटणामध्ये खळबळजनक घटना घडली आहे.पाटणास्थित गायघाट येथील रिमांड होममधून बेतिया कोर्टात सुनावणीसाठी नेण्यात आले. प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलीसोबत तिच्या कथित प्रियकराने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, ही घटना अल्पवयीन मुलगी (१६ वर्षीय) गरोदर राहिल्याचे कळल्यावर उजेडात आली. याप्रकरणी बेतिया राजकीय रेल्वे ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेतिया राजकीय रेल्वे पोलीस ठाण्यात पीडित मुलीने या वर्षी ७ जानेवारीला रिमांड होमच्या पोलीस कोठडीतून बेतिया कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यासाठी नेण्यात आले. प्रवासादरम्यान पाटणापासून कथित प्रियकर देखील त्याच बसने प्रवास करत होता. हाजीपूरपर्यंत पीडित मुलगी आणि प्रियकर आले. बसचे भाडे तिच्या प्रियकराने दिले, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. त्यानंतर हाजीपूर येथे दोघांना ट्रेन पकडली आणि मुजफ्फरपूर ते बेतिया प्रवासादरम्यान पोलीस कर्मचारी विश्वनाथ सिंहला ५०० रुपयांची लाच देऊन मुलीला बाथरूममध्ये घेऊन गेला. तेथे कथित प्रियकराने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर कोर्टात सुनावणी झाली आणि पुन्हा तिची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली असल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली. दरम्यान रिमांड होमच्या अधीक्षिकाला संशय आल्याने तिने तपास केला असता ती मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्याची खळबळजनक माहिती समोर आली. त्यानंतर अधीक्षिका यांनी याबाबत माहिती बेतिया कोर्टाला दिली. त्यावर कोर्टाने बेतिया महिला ठाण्याचे प्रभारी पूनम कुमारी यांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदविण्यास सांगितले. या जबाबावर बेतिया रेल्वे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पोलीस याबाबत तपास करत आहेत. 


Web Title: Shocking! A minor girl who lives in remand home got pregnant
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.