Shocking! A minor boy working in a bicycle shop filled air his body and ... | धक्कादायक! सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने शरीरात हवी भरली अन्...

धक्कादायक! सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाने शरीरात हवी भरली अन्...

ठळक मुद्देलॉकडाऊन होण्याआधी महिन्यांपूर्वी त्याने आपल्या मुलाला गावाबाहेर वेल्डिंग शॉपवर कामावर ठेवले. जवळच सायकल पंक्चरचे दुकान आहे. तिथे काम करणार्‍या 17 वर्षाच्या मुलाने बर्‍याचदा मुलाबरोबर गैरवर्तन केले होते.

पंजाबमधील अमृतसर या गावात वेल्डिंग शॉपमध्ये काम करणार्‍या एका 11 वर्षाच्या मुलाच्या शरीरात हवा भरल्याने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यांना प्रकृती चिंताजनक असून वल्ला येथील श्री गुरु रामदास रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून रमदास पोलीस स्टेशनमध्ये सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मृताच्या वडिलांनी सांगितले की, तो कष्ट करून कुटुंब चालवत होता. चार वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहत आहे. वडील आपल्या आई आणि मुलासह राहत हप्ते. त्याचा मुलगा सरकारी शाळेत शिकला. लॉकडाऊन होण्याआधी महिन्यांपूर्वी त्याने आपल्या मुलाला गावाबाहेर वेल्डिंग शॉपवर कामावर ठेवले. जवळच सायकल पंक्चरचे दुकान आहे. तिथे काम करणार्‍या 17 वर्षाच्या मुलाने बर्‍याचदा मुलाबरोबर गैरवर्तन केले होते.
 

शुक्रवारी आरोपीने त्यांच्या मुलाला त्याच्या दुकानात बोलावून घटना घडवून आणली. यामुळे मुलाच्या पोटाच्या आतड्या फुटल्या. नंतर त्याला श्री गुरु रामदास रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सायकल पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. रमदास पोलीस ठाण्याचे प्रभारी मन्तेज सिंह यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह नातेवाईकांच्या पुढील स्वाधीन करण्यात आला आहे, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे. 

Web Title: Shocking! A minor boy working in a bicycle shop filled air his body and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.