गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील बिलिमोरा येथील देसरा भागातून एक धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे आपल्या पूर्वजांना 'मोक्ष' मिळावा यासाठी एका निर्दयी आईने आपल्याच पोटच्या दोन चिमुकल्यांची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. सुनीता शर्मा असे या निर्दयी आईचे नाव आहे. तिला अटक करण्यात आली आहे. तिने आपल्या सासऱ्यांनाही मारण्याचा प्रयत्न केला. पण कसे तरी घरातून बाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भयानक घटना गुरुवारी रात्री बिलिमोरा येथील देसरा भागातील एका फ्लॅटमध्ये घडली. मूळची उत्तर प्रदेशची असलेली आरोपी सुनीता शर्मा, तिचा पती शिवकांत, प्रत्येकी 7 आणि 4 वर्षांची दोन मुलगे आणि सासू-सासरे एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. दरम्यान, सुनीताचा पती शिवकांत यांना टायफॉईड झाल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डीएसपी बी.व्ही. गोहिल म्हणाले, सुनीताचे सासरे इंद्रपाल आणि त्यांची पत्नी आपला मुलगा शिवकांत यांचा डबा घेऊन रुग्णालयात गेले होते. तेथून परतल्यानंतर ते आपल्या रूममध्ये झोपले होते. तर सुनीता तिच्या बेडरूममध्ये होती. गेल्या काही दिवसांपासून ती अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री अचानक तिने देवांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा यासाठी तिने पोटच्या दोन्ही चिमुकल्यांची गळा दाबून हत्या केली.
यानंतर सुनीताने सासू-सासऱ्यांच्या खोलीत जाऊन सासरे इंद्रपाल यांचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कसेबसे घरातून बाहेर पळ्यात जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी शेजाऱ्यांची मदत मागितली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडला तेव्हा सुनीता तिच्या मृत मुलांच्या शेजारी बसलेली आढळली. पोलिसांनी तिला अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Summary : In Gujarat, a mother murdered her two children, believing it would bring salvation to her ancestors. She also attacked her father-in-law, who narrowly escaped. Police have arrested the woman; the incident has caused shockwaves.
Web Summary : गुजरात में एक मां ने अपने पूर्वजों को मोक्ष दिलाने के लिए अपने दो बच्चों की हत्या कर दी। उसने अपने ससुर पर भी हमला किया, जो बाल-बाल बच गए। पुलिस ने महिला को गिरफ्तार कर लिया है; घटना से सनसनी फैल गई है।