शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एका आठवड्याभरात तब्बल १९ हत्या; 'या' देशात घडला थरकाप उडवणारा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 17:58 IST

19 Murders in one Week: देशांतर्गत हिंसा वाढत चालल्याचे चित्र अनेक देशांमध्ये दिसून येत आहे

19 Murders in one Week: जगभरात विविध देशांमध्ये युद्ध सुरु आहेत. काही देशांमध्ये उघड-उघड संघर्ष सुरू आहेत. तर काही देश एकमेकांच्या सीमारेषेत घुसखोरी करत शीतयुद्ध खेळत आहेत. असे असताना देशांतर्गत हिंसाही वाढत चालल्याचे चित्र अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. मेक्सिको देशातील सिनालोआ प्रांतात सतत गोळीबाराच्या घटनांमुळे इंट्रा-कार्टेल युद्ध सुरू होण्याची भीती वाढली आहे. या भागातून नवनवीन हिंसाचाराची प्रकरे समोर आली आहेत. मेक्सिकन अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात तब्बल १९ हत्यांची नोंद झाली आहे.

सिनालोआ प्रांतात आठवड्यातील सोमवार ते गुरुवार या दरम्यान १२ हत्यांची नोंद झाली. तर पुढील तीन दिवसात आणखी सात हत्येची नोंद झाल्याने ही संख्या १९ वर पोहोचली आहे. एका आठवड्यातील या प्रकारानंतर सिनालोआ प्रॉस्पेक्टस कार्यालयाने शुक्रवारी उशिरा एका निवेदनात म्हटले आहे की नवीन हत्यांची प्रकरणे चार वेगवेगळ्या ठिकाणी सापडली आहेत. कुलियाकनच्या राजधानीत दोन लोक ठार झाले आणि कॉनकॉर्डियाच्या नगरपालिकेत पाच जण ठार झालेत. निवेदनात असेही सांगण्यात आले आहे की, दोन्ही ठिकाणी गुन्हेगारी गटांमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत.

सिनालोआ हा पॅसिफिक किनारपट्टीवरील शक्तिशाली ड्रग गँग सिनालोआ कार्टेलचा तळ आहे. या टोळीचा म्होरक्या एकेकाळी जोआक्विन “एल चापो” गुझमन होता. आता तो US मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जुलैमध्ये आणखी एक गुंड नेता इस्माईल “ईएल मेयो” झाम्बारा याच्या अटकेमुळे टोळीयुद्ध तीव्र होण्याची भीती निर्माण झाली. ती भीती आता खरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीMexicoमेक्सिकोPoliceपोलिस