धक्कादायक! मानखुर्द येथे महिलेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:43 IST2019-01-21T16:42:18+5:302019-01-21T16:43:03+5:30
याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

धक्कादायक! मानखुर्द येथे महिलेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
मुंबई - अलीकडेच कुर्ला परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आता मानखुर्द येथे सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एका विधवा महिलेला रस्त्यात गाठून चार भामट्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिने प्रतिकार केला असता तिला मारहाण करून तिला रस्त्यातच सोडून चौघेजण फरार झाले. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे प्रणय समाधान इंगळे (२१) आणि अमोल (१९) अशी आहेत.
गुरुवारी रात्री घरी जात असताना विधवा महिलेला मानखुर्द मंडाला येथील साठे नगर परिसरातील सर्व्हिस रोडवर चार भामट्यांनी रस्त्यात अडवले. हा रस्ता जास्त वर्दळीचा नसल्याने चार जणांनी महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. महिलेने प्रतिकार केला असता त्यांनी तिला मारहाण करून रस्त्यावरच टाकून पळ काढला. याबाबत मानखुर्द पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७६ )(ड), ३२३ अन्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबई - मानखुर्द येथे ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; पोलिसांनी केली दोघांना अटक
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 21, 2019