नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाहेर (जेएनयू) एका नराधम रिक्षाचालकाने तीन विद्यार्थ्याींना पाहून त्यांच्यासमोर हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २७ वर्षी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपीचे नाव अखिलेश कुमार असून तो उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील रहिवासी आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकारानंतर विद्यार्थींनींनी किशनगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थींनी जेएनयूमधील वसतिगृहात परतत होत्या. त्यावेळी गेटवर उभ्या असलेल्या रिक्षाचालकाने त्यांना पाहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या सर्व प्रकारानंतर विद्यार्थिनींनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली आहे.
धक्कादायक! विद्यार्थिनींसमोर केले हस्तमैथुन; नराधम रिक्षाचालक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 21:28 IST
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २७ वर्षी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
धक्कादायक! विद्यार्थिनींसमोर केले हस्तमैथुन; नराधम रिक्षाचालक अटकेत
ठळक मुद्देअटक आरोपीचे नाव अखिलेश कुमार असून तो उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील रहिवासी आहे. तीन विद्यार्थ्याींना पाहून त्यांच्यासमोर हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.