धक्कादायक! तोंडावर अन् डोक्यात रॉडने मारून अनवलीत शेतकऱ्याची हत्या
By Appasaheb.patil | Updated: July 17, 2023 15:55 IST2023-07-17T15:36:16+5:302023-07-17T15:55:41+5:30
सध्या शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

धक्कादायक! तोंडावर अन् डोक्यात रॉडने मारून अनवलीत शेतकऱ्याची हत्या
सोलापूर : डोक्यात रॉड मारून एका शेतकऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पंढरपुर तालुक्यातील अनवली येथे घडली. आबासाहेब मारुती मिटकरी (वय ५५, रा. अनवली, ता. पंढरपूर) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत अभिमान मेटकरी हे रविवारी अनवली येथील जनावरांच्या बाजारात जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. ते रात्री घरी आलेच नाहीत. घरच्यांनी तात्काळ पंढरपूर ग्रामीण पेालिसांना याबाबतची कल्पना दिली. शिवाय कुटुंबियांनी रात्रभर पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील अनेक गावात शोधाशोध केली.
दरम्यान, पोलिसांकडून शोध घेत असतानाच सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. डोक्यात रॉडने मारून त्यांची हत्या झाली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसाकडे आली आहे. अधिकचा तपास पंढरपूर पोलिस करीत आहेत. सध्या त्या शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.