शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 3 सख्ख्या भावांचे अपहरण आणि खून; जंगलात फेकून दिले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:40 IST

7 आणि 5 वर्षीय मुलांचे मृतदेह पोलिसांना सापडले असून, तिसऱ्याचा शोध सुरू आहे.

Rajasthan Crime News:दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवडी येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे मृतदेह आज दक्षिण दिल्लीतील मेहरौली जंगलात सापडले आहेत. राजस्थान आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेत मुलांचे मृतदेह सापडले. दोघांचे वय 7 वर्षे आणि 5 वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून, आता तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. अपहरणकर्त्यांनी तिघांच्याही खुनाची कबुली दिली आहे.

तीन सख्ख्या भावांचे अपहरणतिन्ही मुलांची जंगलात हत्या केल्याचे अपहरणकर्त्यांने सांगितले. राजस्थान पोलीस आज दोन अपहरणकर्त्यांना घेऊन दिल्लीच्या मेहरौलीच्या जंगलात पोहोचले. अपहरणकर्त्यांच्या सांगण्यावरून दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत, तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. भिवडीतील लेबर कॉलनीतून या तिघांचे अपहरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे तिघे सख्खे भाऊ आहेत.

घरातून तिघे अचानक गायब झाले होतेतीन महिन्यांपूर्वी भिवडीच्या लेबर कॉलनीत ज्ञानसिंग राहायला आले. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले ज्ञान सिंह पत्नी उर्मिला आणि 6 मुलांसह येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते. शनिवारी रात्री 11 वाजता पती-पत्नी घरी परतले असता त्यांना तीन मुले अमन, विपिन आणि शिव घरात नसल्याचे दिसले, तर त्यांची लहान मुलगी घरातच खेळत होती.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन अपहरणकर्त्यांना अटक केली. अपहरणकर्त्यांनी सांगितले की, तीन मुलांची हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह दिल्लीच्या मेहरौली जंगलात फेकून दिला. सध्या अपहरणकर्त्यांच्या सांगण्यावरून दोन मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. मुलांचे अपहरण का करण्यात आले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानKidnappingअपहरणDeathमृत्यूPoliceपोलिसdelhiदिल्ली