Shocking! Junior Officer committed suicide at international airport | धक्कादायक! आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्याने केली आत्महत्या

धक्कादायक! आंतरराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्याने केली आत्महत्या

ठळक मुद्देअभिषय बाबू असं अधिकाऱ्याचं नाव आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन येथे ज्युनिअर इंटेलिजेंस अधिकारी म्हणून अभिषय काम करत होते.

मुंबई - सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एका कनिष्ठ अधिकाऱ्याने उडी मारून आत्महत्या केली आहे. विमानतळ परिसरात असलेल्या पार्किंगच्या पी - १० वरून पी - ४ येथे या पुरुषाने उडी मारून आत्महत्या केली. अभिषय बाबू असं अधिकाऱ्याचं नाव आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन येथे ज्युनिअर इंटेलिजेंस अधिकारी म्हणून अभिषय काम करत होते. घटनास्थळी सहार पोलिसांचे पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे. नेमकं आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप कळालं नसून तपास सुरु आहे, अशी माहिती सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

गंभीर जखमी झालेल्या बाबू यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
 

Web Title: Shocking! Junior Officer committed suicide at international airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.