राजकोट - गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील तीन साधूंनी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपी साधूंनी ७ वेळा बलात्कार केल्याचे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या तिन्ही साधूंना अमरेली पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणाची दम नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या साधूंना बेड्या ठोकण्यात आल्या.या महिलेने मजुरीच्या नावाखाली साधूंनी गेले १८ महिने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. पोलीस सध्या या साधूंनी आणखी इतर महिलांवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. रघुराम भंगार, जगदीश भागात आणि भावेश भागात अशा अटक केलेल्या साधूंची नावे आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली