कल्याणमध्ये धक्कादायक घटना, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या

By मुरलीधर भवार | Updated: October 6, 2023 15:50 IST2023-10-06T15:49:20+5:302023-10-06T15:50:06+5:30

याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विजय जाधव याला अटक केली.

Shocking incident in Kalyan, woman living in live-in relationship murdered | कल्याणमध्ये धक्कादायक घटना, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या

कल्याणमध्ये धक्कादायक घटना, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या

कल्याण : लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरने चाकूने वार करत हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास कल्याणच्या पूर्व परिसरातील विजयनगर आमराई परिसरात घडली आहे.

याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विजय जाधव याला अटक केली. हत्या करणयात आलेल्या महिलेचे नाव रसिका कोळंबेकर आहे. विजय रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून आज सकाळच्या सुमारास विजयने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

विजय नगर आमराई परिसरात विजय जाधव व रसिका कोळंबेकर हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत होते. काही महिन्यांपासून विजय हा रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे या दोघांमध्ये वाद होत होते. आज सकाळच्या सुमारास विजय आणि रसिका मध्ये पुन्हा याच कारणावरून वाद झाला. संतापलेल्या विजयने चाकूने रसिकावर हल्ला केला. 

या हल्ल्यात रसिका गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विजय याला ताब्यात घेतले. रसिका हिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Shocking incident in Kalyan, woman living in live-in relationship murdered