घाटकोपरमधील धक्कादायक घटना; चारित्र्यावर संशय घेत पत्नीची गळा दाबून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 20:07 IST2019-06-13T20:04:55+5:302019-06-13T20:07:30+5:30
मारेकरी पती सचिन दळवी फरार झाला असल्याचे पार्कसाईट पोलिसांकडून सांगण्यात आले.

घाटकोपरमधील धक्कादायक घटना; चारित्र्यावर संशय घेत पत्नीची गळा दाबून हत्या
मुंबई - चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना घाटकोपर येथील रामनगरात घडली आहे. शीतल सचिन दळवी (वय २७ रा. रायगड को-ऑपरेटिव्ह सोसायटी, रामनगर, घाटकोपर प.) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव असून मारेकरी पती सचिन दळवी फरार झाला असल्याचे पार्कसाईट पोलिसांकडून सांगण्यात आले.
सचिन दळवीचा काही वर्षापूर्वी शीतल हिच्याशी विवाह झाला होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण करीत असे. बुधवारी त्यांच्यात पुन्हा याच विषयावरुन भांडण झाले. त्यावेळी त्याने शीतलचा गळा व तोंड दाबून मारले. ती निपचित पडल्यानंतर घरातून पलायन केले. शेजाऱ्यांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. शीतलचा भाऊ राजेश मोरे ( रा. कसारा, शहापूर) याच्या फिर्यादीनुसार सचिन दळवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.