थरकाप उडविणारी घटना! अवघे जग नववर्षाच्या स्वागतात असताना चार बहिणी, आईची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:26 IST2025-01-01T10:26:08+5:302025-01-01T10:26:47+5:30
पाच जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलाला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.

थरकाप उडविणारी घटना! अवघे जग नववर्षाच्या स्वागतात असताना चार बहिणी, आईची हत्या
नववर्षाच्या पहिल्या दिवशी एका थरकाप उडविणारी बातमी येत आहे. लखनऊमध्ये एका हॉटेलमध्ये चार बहीणी आणि त्यांच्या आईची हत्या करण्यात आली आहे. या पाच जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मुलाला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.
आरोपीचे नाव अर्शद असे असून तो २४ वर्षांचा आहे. धारधार ब्लेडने अर्शदने पाचही जणींची हत्या केली आहे. पोलिसांच्या चौकशीत अर्शद वारंवार जबाब बदलत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी तो कुटुंबासोबत ३० डिसेंबरला लखनऊ फिरण्यासाठी आला होता.
अर्शदने आपल्या वडिलांनी ही हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मी वाचलो, यानंतर वडील हॉटेलमधून पळून गेले आहेत व ते आत्महत्या करू शकतात असे त्याने म्हटले आहे. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने गुन्हाही कबुल केला आहे. अर्शदच्या या दाव्याने पोलिसांनी त्याच्या वडिलांचा शोध सुरु केला आहे.
मृतांमध्ये आलिया (9), अल्शिया (19), अक्सा (16), रहमीन (18) या चार बहिणी आणि अस्मा असे त्यांच्या आईचे नाव आहे. हे सर्वजण नाका भागातील हॉटेल शरणजीतमध्ये थांबले होते.