शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेलापूरमधील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 14:59 IST

रुग्ण महिलाही वासनेच्या बळी

ठळक मुद्दे मुलीच्या तक्रारीवरून डॉ. लाड याला बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे.१ एप्रिल रोजी दुपारी क्लिनिकमध्ये कुणीही नसताना डॉ. लाड याने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. उपचारासाठी येणाऱ्या गरीब घरातील तरुणी व महिलांनादेखील पैशांचे प्रलोभन दाखवून अथवा त्यांच्यावर फुकट उपचार करून त्यांच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नवी मुंबई  - महिला रुग्ण व कंपाउंडर यांना वासनेचे बळी करणाऱ्या 55 वर्षीय डॉक्टर ला एनआरआय पोलिसांनीअटक केली आहे. दिवाळे गावात त्याचा दवाखाना असून महिला रूग्णच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना शरीरसंबंध ठेवायला भाग पडायचा.

डॉ. संजय लाड (५५) असे या डॉक्टर चे नाव असून याने क्लिनिकमध्ये कामास असलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर क्लिनिकमध्ये लैंगिक अत्याचार केला होता. सदर  मुलीच्या तक्रारीवरून डॉ. लाड याला बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली एनआरआय पोलिसांनीअटक केली आहे. या नराधम डॉक्टरने त्याच्या क्लिनिकमध्ये यापूर्वी अनेक तरुणींवर तसेच उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.पीडित तरुणी जुईनगर येथे आपल्या आत्याकडे रहाण्यास असून नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली आहे. सुट्टी पडल्याने तिने डॉ. लाड यांच्या क्लिनिकमध्ये कामाला सुरुवात केली होती. १ एप्रिल रोजी दुपारी क्लिनिकमध्ये कुणीही नसताना डॉ. लाड याने पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर तणावाखाली असलेल्या मुलीने मडगाव येथे जाणारी एक्स्प्रेस पकडली. प्रवासादरम्यान ही मुलगी तणावग्रस्त असल्याचे एका महिला प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर तिने तिला बोलते केले. तिने तिच्यावर ओढवलेला सांगितल्यावर महिलने तिची समजूत घालत तिला डॉक्टरविरोधात तक्रार करण्यासाठी नवी मुंबईत पाठवून दिले. ही मुलगी घरी न परतल्याने नातेवाईकांनी क्लिनिक गाठले, मात्र डॉ. लाड याने ती दुपारीच निघून गेल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांनी एनआरआय पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी परतलेल्या या मुलीने घरच्यांना घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर एनआरआय पोलिस ठाण्यात लाडविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री डॉ. लाड याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गुरुवारी त्याला ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.डॉ. लाड हा बीएएमएस डॉक्टर असून तो गेल्या २० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आहे. तसेच, तो गेल्या अनेक वर्षांपासून सीबीडी-बेलापूरमधील दिवाळे गावात आपले क्लिनिक चालवत आहे. डॉ. लाड हा तरुणींनाच कामाला ठेवत होता. त्यानंतर संधी साधून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने यापूर्वी त्याच्याकडे कामाला असलेल्या तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली आहे. उपचारासाठी येणाऱ्या गरीब घरातील तरुणी व महिलांनादेखील पैशांचे प्रलोभन दाखवून अथवा त्यांच्यावर फुकट उपचार करून त्यांच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाArrestअटकPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई