शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मृत्यू कसा होतो, हे मोबाइलवर पाहिले अन् विद्यार्थ्याने घरातच घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 07:19 IST

जळगावमधील घटना; लॉकडाऊनमुळे आला होता मामाकडे

जळगाव :  मृत्यू कसा होतो हे पाहण्यासाठी मोबाइलमध्ये ‘द डेथ क्लॉक’ ही वेबसाइट खुली केली, त्यात जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिले आणि काही क्षणांतच मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे आठवीतील विद्यार्थी सोन्या दीपक कुंवर (१३, रा. धुरे, जि. धुळे) याने घरातच मंगळवारी बाथरूममध्ये गळफास घेतला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल उर्फ सोन्या हा आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. लॉकडाऊन सुरू झाल्याने चार महिन्यांपासून तो तुकारामवाडीतील  मामा दीपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मंगळवारी ते कामानिमित्ताने घराबाहेर होते. हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानवर गेली. परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. नातेवाइकांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात नेले, नंतर तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. 

बालहट्टामुळे घेतलेला मोबाइलच बेतला जीवावरहर्षलच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. वडिलांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने हर्षलची आई भाजीपाला विक्री करते. एकुलत्या मुलाच्या हट्टापायी तिने हप्त्यांवर काही दिवसांपूर्वीच १५ हजारांचा मोबाइल खरेदी करून दिला होता. तोच मृत्यूस कारणीभूत ठरला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSuicideआत्महत्या