Shocking! Husband murdered of wife due to doubt on character | धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या
धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

ठळक मुद्देएजाज खान रोशन खान (३२) रा. पोघात याने त्याची पत्नी बिलकीस बी (३०) ही झोपेत असताना तिच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारली.अटक करून त्याचेवर भा. दं. वि. कलम ३०२,२०१ नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.

मंगरुळपीर - चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना  १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान तालुक्यातील पोघात येथे घडली. यासंदर्भात रोशन खान रशीद खान रा. पोघात यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार १३ नोव्हेंबरच्या रात्री माझी आई नजीराबी ही  घरी येवून मला सांगितले की, एजाज खान रोशन खान (३२) रा. पोघात याने त्याची पत्नी बिलकीस बी (३०) ही झोपेत असताना तिच्या डोक्यावर काहीतरी जड वस्तू मारली. त्यात तिच्या डोक्याला जखम होऊन रक्त निघत असून ती मरण पावली आहे. 

एजाज खानने तिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिला जीवाने मारले आहे. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी  एजाज खानला अटक करून त्याचेवर कलम ३०२, २०१ भांदवी नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत. अटक करून त्याचेवर भा. दं. वि. कलम ३०२,२०१ नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.

Web Title: Shocking! Husband murdered of wife due to doubt on character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.