शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गर्लफ्रेंडचा नकार ऐकून बॉयफ्रेंडने कहरच केला, घरावर ग्रेनेड फेकला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:19 IST

Crime News : प्रेमात नकार पचवण्याची क्षमता नसलेल्या एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडच्या घरावर थेट ग्रेनेड बॉम्ब फेकला.

प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, असं म्हणतात. पण, याच प्रेमाचा नाद आता एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. प्रेमात नकार पचवण्याची क्षमता नसलेल्या एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडच्या घरावर थेट ग्रेनेड बॉम्ब फेकला. मात्र, या घटनेत त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव वाचला आणि तरुणाचाच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना थायलंडमध्ये घडली आहे.

गर्लफ्रेंडने दिला नकार!

थायलंडमध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाने आपल्या माजी प्रेयसीच्या घरी जाऊन, पुन्हा एकदा नात्याला संधी देण्याची मागणी केली. मात्र, त्याच्या माजी प्रेयसीने यासाठी थेट नकार दिला. तिचा नकार ऐकताच तरुणाचा संताप अनावर झाला आणि त्याने मनात एक मोठी योजना तयार केली. त्याने गर्लफ्रेंडच्या घरावर ग्रेनेड बॉम्ब फेकला.

बँकॉक पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना २५ मे रोजी थायलंडच्या चाना जिल्ह्यात घडली आहे. या ग्रेनेड स्फोटात ३५ वर्षांच्या सुरपोंग थोंगनाक याचा मृत्यू झाला असून, चार लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती स्थानिक माध्यमांना दिली. सुरपोंग हा त्याच्या माजी गर्लफ्रेंडच्या घरी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी द्यावी, अशी विनंती करण्यासाठी गेला होता. मात्र, तिने नकार देताच याचा राग अनावर झाला.

कैचीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला 

चिडलेल्या सुरपोंगने माजी प्रेयसीवर कैचीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून त्याला रोखलं. यानंतर सुरपोंग आपल्या गाडीच्या दिशेने गेला आणि त्याने गाडीतून एम २६ फ्रेगमेंटेशन ग्रेनेड बाहेर काढला. त्याची पीन काढून त्याने तो बॉम्ब त्याला थांबवणाऱ्या लोकांकडे भिरकवला. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्याचा स्फोट झाला नाही. म्हणून सुरपोंगने तो बॉम्ब उचलला. मात्र, त्याने उचलताच त्याच्या हातातच बॉम्बकहा स्फोट झाला. 

गर्लफ्रेंड थोडक्यात बाचावली

या स्फोटामुळे आजूबाजूला उभ्या असणाऱ्या गाड्यांचे देखील मोठे नुकसान झाले. पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा सुरपोंग रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो निष्फळ ठरला. या घटनेत दोन पुरुष आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. या स्फोटादरम्यान सुरपोंगची माजी प्रेयसी घरात निघून गेल्याने, थोडक्यात बचावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातBombsस्फोटकेThailandथायलंड