धक्कादायक! पंजाबहून आलेल्या तरूणीवर मुंबईत अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:19 PM2019-11-18T23:19:16+5:302019-11-18T23:19:52+5:30

याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shocking! Girl raped in mumbai who came from punjab | धक्कादायक! पंजाबहून आलेल्या तरूणीवर मुंबईत अत्याचार

धक्कादायक! पंजाबहून आलेल्या तरूणीवर मुंबईत अत्याचार

Next

मुंबई - पंजाब येथे राहणारी तरूणी आई वडिलांमध्ये होत असलेल्या वादाला कंटाळून मुंबईत आली असता तिच्यावर नागपाडा परिसरात एका माथेफिरुने अत्याचार केल्याने, एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी माथेफिरुला अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मोहम्मद अख्तर रियाजुद्दीन कुरेशी (४५) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे. पंजाबमध्ये राहणाऱ्या पिडीत तरुणीच्या आई, वडिलांमध्ये वारंवार भांडण सुरू होते. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. १५ ऑक्टोबरला याच कारणावरून तरूणीचा आईसोबत वाद झाला. आई, वडील काहीच ऐकत नसल्याने१७ ऑक्टोबरला काही रोख रक्कम घेऊन तरूणी घराबाहेर पडली. सुमारे २५ दिवस सुवर्ण मंदिर, अमृतसर, पंजाब, सुरत अशी फिरत राजस्थानच्या हनुमानगडला पोहोचली. पैसे संपत आल्याने तिने मुंबईची ट्रेन पकडली. मुंबई सेंट्रल स्थानकावर ९ नोव्हेंबरला पहाटे चारच्या सुमारास ती उतरली. स्थानकाबाहेर एकटीच फिरत असल्याने तिच्यामागे भटके कुत्रे लागले. ते पाहून अख्तर तिच्या मदतीसाठी धावला. अख्तरने तिची विचारपूस केली असता तिने सर्व हकीकत सांगितली आणि भूक लागल्याने सांगू लागली. अख्तरने तिला हाॅटेलमध्ये खाऊ घातले आणि राहण्याची व्यवस्था करतो असे सांगून कामाठीपुरा येथील खोलीत घेऊन गेला. 

तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. आरडाओरड करूनही तिच्या मदतीला कुणी आले नाही. घराबाहेर पडलीस तर याद राख असा दम देऊन अख्तर निघून गेला. मात्र, संधी मिळताच तिने येथून पळ काढला. वस्तीबाहेर येताच तिला गस्तीवर असलेले पोलीस दिसले. तिने पोलिसांना सर्व सांगितले. पोलिस तरूणीला घेऊन ठाण्यात जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अख्तरला तिने ओळखले आणि पोलिसांना दाखविले. पोलिसांनी तत्काळ या नराधमाला ताब्यात घेऊन अटक केली. तर याचा अधिक तपास सुरु असलयाचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shocking! Girl raped in mumbai who came from punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.