धक्कादायक! महिलेवर चार वेळा लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला बोरीवलीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 20:03 IST2019-06-04T20:01:44+5:302019-06-04T20:03:38+5:30
कामाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! महिलेवर चार वेळा लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला बोरीवलीत अटक
मुंबई - कामाचे आमिष दाखवत ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
ईश्वर अडवाणी असे अटक व्यक्तीचे नाव आहे. बोरीवली परिसरात त्याचे कार्यालय आहे. या कार्यालयात काम देण्याचे आमिष दाखवत, मधू (नावात बदल) महिलेवर एकदा नाही, तर चार वेळा त्याने लैंगिक अत्याचार केले, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी तिने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, अडवाणी याला अटक करण्यात आल्याचे बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांनी सांगितले. मात्र, मधूने खोटा आरोप केल्याचे अडवाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे.
गडगंज श्रीमंत असलेल्या अडवाणी यांना खोट्या आरोपात अडकवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्याचा एका टोळीचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार, यात तथ्य आहे का, याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत. ही बाब खरी असल्यास, संबंधित व्यक्तीवरही योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.