धक्कादायक : नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार केला, नंतर विष पाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 15:22 IST2021-05-31T15:20:12+5:302021-05-31T15:22:03+5:30
Crime News : नराधम बापाला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे.

धक्कादायक : नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार केला, नंतर विष पाजले
पिंपळगाव सराई (बुलडाणा): अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची घटना रायपूर पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावात घडली़. अत्याचाराला विराेध केल्याने आराेपी बापाने मुलीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़. या प्रकरणी पाेलिसांनी नराधम बापाला अटक केली असून न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली़.
रायपूर पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तीच्या बापाने २७ मे राेजी अत्याचार केला़. विराेध केला असता मुलीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला़. पिडीत मुलीने ३० मे राेजी रायपूर पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेउन नरामध बापाविरुद्ध तक्रार दिली़. या प्रकरणी रायपूर पाेलिसांनी आराेपी बापाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़. पाेलिसांनी आराेपी बापास ३० मे राेजी रात्री अटक करून ३१ मे राेजी न्यायालयासमाेर हजर केले असता न्याायलयाने त्याला दाेन दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली़.
पिडीत मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू ाहे़ पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे करीत आहेत़.