मुंबई - कुर्ल्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या चार वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा व्हिडीओ वायरल झाला आणि त्याची दखल घेत चुनाभट्टी पोलिसांनीअटक केली आहे. अझरुद्दिन शेख असं या नराधम बापाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शेखच्या बायकोनेच शूट केला होता.कुर्ल्यात राहणारा शेख हा व्यवसायाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. गेल्या शुक्रवारी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. शेख त्याच्या चार वर्षीय मुलाला बेदम मारत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. शेखच्या पत्नीनेच तो व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला होता. त्यानंतर व्हिडीओत दिसणारा इसम हा शेख असल्याचं उघड झालं. नंतर शेख याला अटक करण्यात आली. मात्र, बालहक्क न्यायालयाने शेख याला काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.त्याने मुलगा मोठ्याने रडत असल्यामुळे त्याला मारल्याचं कबूल केलं. शेख याच्या बायकोने तो व्हिडीओ तिच्या बहिणीला पाठवला होता आणि तिथूनच तो त्याच्या नातेवाईकांपासून व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेला वाच्या फुटली असं पोलीस तपासात उघड झालं आहे. शेखच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असून तिथे त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
धक्कादायक! बापाकडून चिमुरड्याला बेदम मारहाण; पत्नीकडून व्हिडीओ वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 14:06 IST
हा व्हिडीओ शेखच्या बायकोनेच शूट केला होता.
धक्कादायक! बापाकडून चिमुरड्याला बेदम मारहाण; पत्नीकडून व्हिडीओ वायरल
ठळक मुद्देकुर्ल्यात राहणारा शेख हा व्यवसायाने प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. बालहक्क न्यायालयाने शेख याला काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा व्हिडीओ वायरल झाला आणि त्याची दखल घेत चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली