Shocking! Exposed sex racket under the name of spa massage center | धक्कादायक! स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

धक्कादायक! स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ठळक मुद्दे मसाज सेंटरच्या मालकाला देखील अटक करून कारवाई करण्यात आली आहे. छाप्यात स्पामध्ये सापडलेल्या राजेश कानुरे,शिवा कोळपे, रितेश घाटकर आणि विक्रम पलांडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पिंपरी - पिंपरी - चिंचवड परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचापोलिसांनी पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी पिंपरी शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या स्पाईन सीटी मॉलमधील दुकान नंबर ३ व ४ मध्ये सिटी स्पा मसाज सेंटर येथे सुरु असलेले हे सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. पोलिसांनी सहा तरुणींची सुटका केली आहे. 

पिंपरी शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या स्पाईन सीटी मॉलमधील दुकान नंबर ३ व ४ मध्ये सिटी स्पा मसाज सेंटर या नावाने पार्लर सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सिटी स्पा मसाज सेंटर येथे छापा टाकला. छाप्यात स्पामध्ये सापडलेल्या राजेश कानुरे,शिवा कोळपे, रितेश घाटकर आणि विक्रम पलांडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या चौघांविरोधात तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम ३७०, ३४ आणि पिटा कायदा कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करत चौघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तसेच मसाज सेंटरच्या मालकाला देखील अटक करून कारवाई करण्यात आली आहे. 

सेक्स रॅकेटचे आणखी एक बॉलीवूड कनेक्शन उघड, कास्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला अटक

Web Title: Shocking! Exposed sex racket under the name of spa massage center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.