धक्कादायक....नराधम बापाचा चिमुरडीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:59 IST2018-09-15T17:58:14+5:302018-09-15T17:59:30+5:30

खामगाव: जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये ९ वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीे

Shocking .... Drunken father raped daughter | धक्कादायक....नराधम बापाचा चिमुरडीवर अत्याचार

धक्कादायक....नराधम बापाचा चिमुरडीवर अत्याचार

ठळक मुद्देमुलगी घरात एकटी असल्याने ४५ वर्षीय दारूड्या बापाने आपल्या सख्या मुलीवर अत्याचार केला.आई घरी आल्यानंतर दारूच्या नशेत त्याने तिलाही जबर मारहाण केली आणि मुलांसह घराबाहेर काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये ९ वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापास अटक करुन कारवाई सुरु केलीे. खामगाव तालुक्यातील सुटाला खुर्द गावात हा लज्जास्पद बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला.

पीडित मुलीची आई घराघरात धुणीभांडी करते. नेहमीप्रमाणे ती कामाला गेली होती. सायंकाळ होताच पीडित मुलगी शाळेतून घरी आली. तिला आणखी दोन भाऊ आहेत. ते बाहेर खेळत होते. मुलगी घरात एकटी असल्याने ४५ वर्षीय दारूड्या बापाने आपल्या सख्या मुलीवर अत्याचार केला. यानंतर रात्री पीडितेची आई घरी आल्यानंतर दारूच्या नशेत त्याने तिलाही जबर मारहाण केली आणि मुलांसह घराबाहेर काढले. रात्रभर आई, पीडिता आणि तिचे दोन भाऊ हे गावच्या मंदिराजवळ झोपले होते. सकाळ होताच पीडित मुलीची तब्येत बिघडली. तिला तिच्या आईने काय झालं विचारलं असता हा सगळा गंभीर प्रकार समोर आला. यानंतर या प्रकरणासंबंधी पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पीडित मुलीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

Web Title: Shocking .... Drunken father raped daughter