शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

धक्कादायक! मुलाने होमवर्ग नाही केला म्हणून वडिलांनी दिली क्रूर शिक्षा, आईने व्हिडीओ रेकॉर्ड केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 20:55 IST

Crime News: होमवर्क न केल्याने एका माथेफिरू बापाने स्वत:च्यात मुलाला क्रूर शिक्षा दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभ्यास न केल्याने या क्रूर बापाने मुलाला बांधून उलटा टांगताना दिसत आहे.

जयपूर - राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे होमवर्क न केल्याने एका माथेफिरू बापाने स्वत:च्यात मुलाला क्रूर शिक्षा दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभ्यास न केल्याने या क्रूर बापाने मुलाला बांधून उलटा टांगताना दिसत आहे. तसेच नंतर मुलाला काठीने मारहाण करताना दिसत आहे. मात्र मुलाच्या आईने मध्ये पडत मुलाला वाचवले.  आता या प्रकरणी मुलाच्या मामाने तक्रार केली आहे. त्यानंतर आता बुंदी पोलीस आणि चाईल्ड लाइनकडून कारवाई केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार चित्तौडगड जिल्ह्यातील बैकुंठपूरमधील बेगू येथील राहणाऱ्या मुलाच्या मामाने चाईल्ड लाईन चित्तोडगडकडे तक्रार दिली आहे. तसेच याबाबतचे व्हिडीओही उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या प्रकाराचा व्हिडीओही दिला आहे. चाइल्ड लाईन चित्तोडगडने बेगू पोलिसांना या प्रकाराची खबर दिली आहे. मात्र ही घटना बुंदी जिल्ह्यात घडल्याने तेथील पोलिसांकडूनच या प्रकरणात कारवाई करण्यात येणार आहे.

ही घटना बुंदी जिल्ह्यातील डाबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एक आठ वर्षांचा मुलगा खेळण्यासाठी गेला होता. तसेच त्याने होमवर्क केला नव्हता. त्यामुळे त्याचे वडील संतप्त झाले. त्यांनी त्याचे हातपाय बांधले आणि त्याला उलटे टांगले. यादरम्यान, मुलाच्या आईनेही पतीची मदत केली. मात्र वडिलांनी त्याला काठीने मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईने मध्ये पडून त्याला वाचवले. मुलाच्या आईने मोबाईल कॅमेरा सुरू करून खिडकीवर ठेवून या प्रकाराची रेकॉर्डिंग केली. त्यामुळे हा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. दरम्यान, मुलाची आई मंगळवारी मुलाला घेऊन बुंदीहून चित्तौडगडला गेली. तिथे तिने भावाला बोलावून रेकॉर्डिंग पाठवले. तसेच भावासोबत मुलालाही पाठवले.

सध्या हा पीडित मुलगा बेगू येथे आपल्या मामासोबत राहत आहे. तसेच या प्रकरणी सीडब्ल्यूसी इंचार्ज सीमा पोदार यांनी हा व्हिडीओ डाबीमधील राजपुरा गावातील असल्याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की याबाबत मुलाचा मामा सध्या काही सांगत नाही आहे. दरम्यान, मुलाच्या वडिलांना हजर राहण्यासाठी नोटिस बजावल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानFamilyपरिवारEducationशिक्षण