धक्कादायक! रील बनवण्याची होती आवड, आयफोन घ्यायचा होता; आईनेच विकलं 8 महिन्यांचं बाळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:37 IST2023-07-28T13:36:50+5:302023-07-28T13:37:17+5:30
Crime News : पश्चिम बंगालच्या परगना जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. मुलाच्या आईलाही आधीच अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! रील बनवण्याची होती आवड, आयफोन घ्यायचा होता; आईनेच विकलं 8 महिन्यांचं बाळ...
Crime News :पश्चिम बंगालमधून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे कपलने आपल्या पोटच्या पोराला विकलं. मुलाला विकण्याचं कारण हैराण करणारं आहे. कपलने आपल्या 8 महिन्यांच्या बाळाला विकल जेणेकरून रील बनवण्यासाठी त्यांना आयफोन घेता यावा.
पश्चिम बंगालच्या परगना जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. मुलाच्या आईलाही आधीच अटक करण्यात आली आहे. नंतर मुलाच्या वडिलाला अटक केली कारण तो फरार होता.
महत्वाची बाब म्हणजे कपलच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना मुलगा दिसला नाही तर त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, बाळ कुठं आहे. यादरम्यान त्यांना कपलच्या वागण्यावर संशय आला. शेजाऱ्यांनी बाळाबाबत आणखी विचारलं तेव्हा कपलने स्वत:चं सांगितलं की, त्यांनी त्यांचं बाळ विकलं. हे कपल गेल्या काही दिवसांआधी आर्थिक अडचणीत होतं आणि अचानक त्यांनी आयफोन खरेदी केला. तसेच राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रील्स बनवले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बाळ खारदह भागातील एका महिलेकडून ताब्यात घेण्यात आलं. अर्थातच आयफोन खरेदी करण्यासाठी कपलने आपल्या बाळाला विकलं होतं. प्रियंका घोष नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
शेजाऱ्यांचा आरोप आहे की, कपलला एक सात वर्षांची मुलगी सुद्धा आहे आणि ती नशेच्या पदार्थांच सेवन करते. दोघांना आपल्या मुलीला सुद्धा विकायचं होतं.
एका स्थानिक नेत्यानुसार, कपल आपल्या मुलीलाही विकणार होतं. मुलाला विकल्यानंतर आरोपी जयदेव शनिवारी आपल्या मुलीला सुद्धा विकणार होता. आम्हाला सूचना मिळताच आम्ही पोलिसांना कळवलं. जयदेवला पोलिसांनी अटक केली.