Shocking Cocaine seized at Khar; Foreign nationals arrested | धक्कादायक! खार येथून ३ कोटीचे कोकेन जप्त; परदेशी नागरिकास अटक 
धक्कादायक! खार येथून ३ कोटीचे कोकेन जप्त; परदेशी नागरिकास अटक 

ठळक मुद्दे नाव डेव्हिड लेमरॉन ओल तुबुलाई (३३) असं आहे. या अमली पदार्थाची बाजारात ३ कोटी ६ लाख इतकी किंमत आहे. हा खार, जुहू आणि वर्सोवा परिसरात कोकेन पुरविणारा मुख्य सप्लायर असलेल्या डेव्हिड या केनियाच्या नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई - खार, जुहू आणि वर्सोवा परिसरातील कोकेन पुरविणाऱ्या परदेशी सप्लायरला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने काल अटक केली आहे. आरोपी हा केनियाच्या नागरिक असून त्याचे नाव डेव्हिड लेमरॉन ओल तुबुलाई (३३) असं आहे. हा खार, जुहू आणि वर्सोवा परिसरात कोकेन पुरविणारा मुख्य सप्लायर असलेल्या डेव्हिड या केनियाच्या नागरिकाला पोलिसांनीअटक केली आहे. 

पोलीस खार परिसरात पेट्रोलिंग करत असताना संशयित व्यक्ती हातात हिरवी बॅग घेऊन वावरत असल्याचे आढळुन आला. त्यानंतर त्याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या अंगझडतीत ५१० ग्राम कोकेन हा अमली पदार्थ पोलिसांना सापडला. या अमली पदार्थाची बाजारात ३ कोटी ६ लाख इतकी किंमत आहे.  

Web Title: Shocking Cocaine seized at Khar; Foreign nationals arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.