शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पैशांच्या वादातून मुलानेच केला आईवर अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 19:21 IST

घाबरलेल्या आईने त्यांच्या शेजाऱ्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ती विविस्त्र अवस्थेतच शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धावून गेली.

ठळक मुद्देमाय-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना ओहियो या देशात घडली आहे.पैशांच्या वादातून एका ४६ वर्षीय इसमाने त्याच्या आईशी झटापटी केली. या नराधम मुलाने आपल्या आईला याआधीही मारण्याचा खूपवेळा प्रयत्न केला होता.

ओहियो- माय-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना अमेरिकेतील ओहियो या राज्यात घडली आहे. घरगुती वादात एका नराधम मुलाने चक्क आपल्या आईवरच बलात्कार केला आहे. याप्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली आहे. येथील सिनसिनाटी या शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. पैशांच्या वादातून एका ४६ वर्षीय इसमाने त्याच्या आईशी झटापट केली. तिला मारहाण केली. यातून त्याचं मन भरलं नाही म्हणून त्याने चक्क आईवरच बलात्कार केला.

घाबरलेल्या आईने त्यांच्या शेजाऱ्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ती विवस्त्र अवस्थेतच शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धावून गेली. मात्र या नराधम मुलाने तिला जोरात मागे खेचलं आणि घरात ढकलून दिलं. या सगळ्या प्रकारानंतर तो झोपी गेला. तिच संधी साधून आईने पोलिसांना बोलावलं. पोलिसांना हा प्रकार कळला तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. पोलीस घरी आले तरी तो घरी झोपलेल्या अवस्थेतच होता.

त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने त्याचा गुन्हा मान्य केला खरा पण मला आता या सर्व गोष्टीची लाज वाटतेय, जे घडलं ते व्हायला नको हवं होतं, असं म्हणत स्वतःची शिक्षा कमी करून घेण्याचा प्रयत्न त्याने केला. या नराधम मुलाने आपल्या आईला याआधीही मारण्याचा खूपवेळा प्रयत्न केला होता. गेल्या मार्च महिन्यात त्याने आईला बेदम मारहाण केली होती. मात्र तेव्हा तिने त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला नाही, म्हणून या नराधमाची यावेळेस आईच्याच इभ्रतीवर हात टाकण्याची मजल गेली.

सौजन्य -  www.mirror.co.uk

टॅग्स :Crimeगुन्हाInternationalआंतरराष्ट्रीय