खळबळजनक! पैशांच्या वादातून मुलानेच केला आईवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 19:21 IST2017-10-26T16:52:12+5:302017-10-26T19:21:33+5:30
घाबरलेल्या आईने त्यांच्या शेजाऱ्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ती विविस्त्र अवस्थेतच शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धावून गेली.

खळबळजनक! पैशांच्या वादातून मुलानेच केला आईवर अत्याचार
ओहियो- माय-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना अमेरिकेतील ओहियो या राज्यात घडली आहे. घरगुती वादात एका नराधम मुलाने चक्क आपल्या आईवरच बलात्कार केला आहे. याप्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली आहे. येथील सिनसिनाटी या शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. पैशांच्या वादातून एका ४६ वर्षीय इसमाने त्याच्या आईशी झटापट केली. तिला मारहाण केली. यातून त्याचं मन भरलं नाही म्हणून त्याने चक्क आईवरच बलात्कार केला.
घाबरलेल्या आईने त्यांच्या शेजाऱ्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ती विवस्त्र अवस्थेतच शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धावून गेली. मात्र या नराधम मुलाने तिला जोरात मागे खेचलं आणि घरात ढकलून दिलं. या सगळ्या प्रकारानंतर तो झोपी गेला. तिच संधी साधून आईने पोलिसांना बोलावलं. पोलिसांना हा प्रकार कळला तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. पोलीस घरी आले तरी तो घरी झोपलेल्या अवस्थेतच होता.
त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने त्याचा गुन्हा मान्य केला खरा पण मला आता या सर्व गोष्टीची लाज वाटतेय, जे घडलं ते व्हायला नको हवं होतं, असं म्हणत स्वतःची शिक्षा कमी करून घेण्याचा प्रयत्न त्याने केला. या नराधम मुलाने आपल्या आईला याआधीही मारण्याचा खूपवेळा प्रयत्न केला होता. गेल्या मार्च महिन्यात त्याने आईला बेदम मारहाण केली होती. मात्र तेव्हा तिने त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला नाही, म्हणून या नराधमाची यावेळेस आईच्याच इभ्रतीवर हात टाकण्याची मजल गेली.
सौजन्य - www.mirror.co.uk