शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

धक्कादायक! गळ्यातील सोन्याची चेन खेचताना चोराने महिलेला नेलं फरफटत, कार थोडी पुढे जाताच... (Viral Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 9:11 PM

ही अतिशय भयावह घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली

Chain Snatching Viral Video: चेन स्नॅचिंग हा प्रकार अतिशय धोकादायक आहे. अनेकवेळा याविरोधात पोलिसांने दंड थोपटले आहेत, पण सर्व प्रयत्न करूनही चेन स्नॅचिंगच्या घटना कमी होत नाहीत. देशातील बहुतांश शहरांच्या कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे असूनही गुन्हेगार त्याला न जुमानता चेन स्नॅचिंग करताना दिसतात. नुकतेच याचे एक भयावह उदाहरण तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाले. चेन स्नॅचिंगच्या या घटनेने स्थानिकांसह पोलिसही हैराण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तामिळनाडूतील चेन स्नॅचिंगच्या या घटनेत गुन्हेगारांचा नवा प्रकार समोर आला. आतापर्यंत चोरटे दुचाकीवरून चेन स्नॅचिंगच्या घटना घडवत असल्याचे माहिती होते. मात्र या घटनेत गुन्हेगारांनी कारचा वापर केला. ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे, कारण यात पीडितेचा जीवही जाऊ शकला असता. तामिळनाडूतील कोईम्बतूरमधील बीलामेडू परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला सोमवारी मॉर्निंग वॉकला गेली होती. ती तिच्या घरापासून काही अंतरावर पोहोचली असावी की तिच्यावर आधीच लक्ष ठेवलेल्या गुन्हेगारांनी तिचा पाठलाग केला. एक पांढऱ्या रंगाची कार आली, त्यात ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसलेल्या चोरट्याने खिडकीतून हात काढून महिलेच्या गळ्यातील चेन ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने तिची चेन पकडून ठेवली त्यामुळे ती खाली पडली. त्यानंतर चोराने पीडितेला कारसह काही मीटरपर्यंत ओढत नेले. महिला खाली पडताच कार भरधाव वेगात पळून गेली. पाहा व्हिडीओ-

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या घटनेत सामील असलेल्या शक्तीवेल आणि अभिषेक या दोन चोरट्यांना अटक केली. या घटनेत वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत झाली. गाडीला नंबरप्लेट नसतानाही पोलिसांनी गाडीवरील स्टिकर ओळखून त्याचा माग काढला

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीTamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस