धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 14:26 IST2020-07-25T11:08:43+5:302020-07-31T14:26:53+5:30
खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट..

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून; खेड तालुक्यातील घटना
पुणे : करंज विहिरे( ता. खेड) येथील थोपटवाडी मधील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी उशिरा विवस्त्र अवस्थेत या मुलीचा मृतदेह निर्जन स्थळी आढळून आला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या हत्येप्रकरणी रात्री उशिरा चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजीवहिरे येथील थोपटवाडीमधील आरती सोपान कलवडे (वय१७ ) या अल्पवयीन मुलीचा भामा आसखेड धरणाच्या कालव्याजवळ निर्जनस्थळी विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. डोक्यात दगड घालुन निर्घृणपणे हा खून करण्यात आला आहे. ही घटना मयत मुलीच्या घरापासुन सुमारे २०० मीटर अंतरावर घडली आहे.
अल्पवयीन मुलीच्या खूनप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत ४ संशयितांचे नावे दिली आहे. मात्र, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कोणाही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले नव्हते. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.