धक्कादायक प्रकार! दिराला खांद्यावर बसवून काढली महिलेची धिंड

By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 08:58 AM2021-02-16T08:58:26+5:302021-02-16T09:01:38+5:30

Crime News : या घटनेचे सुमारे चार व्हिडीओ समोर आले असून, यामध्ये एका महिलेच्या खांद्यावर पुरुषाला बसवण्यात आल्याचे दिसत आहे.

Shocking! brother in Law Sitting on the woman's shoulder & Forced her to walk 3 km | धक्कादायक प्रकार! दिराला खांद्यावर बसवून काढली महिलेची धिंड

धक्कादायक प्रकार! दिराला खांद्यावर बसवून काढली महिलेची धिंड

Next

भोपाळ - एका महिलेला मारहाण करून, अपमानास्पद वागणूक देत तिच्या खांद्यावर दिराला बसवून तिची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (women harassment) याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ही घटना मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) गुणा जिल्ह्यात घडली आहे. गुणा जिल्ह्यातील सागई आणि बांसखेडी गावात हा प्रकार घडला आहे. (Madhya Pradesh Crime News)

या घटनेचे सुमारे चार व्हिडीओ समोर आले असून, यामध्ये एका महिलेच्या खांद्यावर पुरुषाला बसवण्यात आल्याचे दिसत आहे. या महिलेला एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चालवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित आहे. तिने सांगितले की, माझे पहिले सासर बांसखेडी गावात आहे. माझ्या पतीने मला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मी आधीच्या पतीच्या मर्जीनुसार मी अन्य व्यक्तीसोबत राहायला गेले. त्या तरुणासोबत मी सागई येथे राहू लागले.

गेल्या महिनाभरापासून मी आणि हा युवक पती-पत्नीप्रमाणे राहत होतो. मात्र अचानक ९ फेब्रुवारी रोजी माझे आधीचे सासरे तसेच अन्य आठ जण सागई येथील माझ्या घरी आले. त्यांनी मला मारहाण करून आधीचे सासर असलेल्या बांसखेडी येथे नेले. सागई गावातून बांसखेडीचा रस्ता तीन किलोमीटर अंतरावर आहे. यादरम्यान मला मारहाण केली गेली. त्यानंतर माझा दीर माझ्या खांद्यावर बसला. त्या स्थितीत मला सागई येथून बांसखेडी पर्यंत नेण्यात आले, असे पीडित महिलेने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडीओ बनवून काही लोकांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबत सिरसी पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश शर्मा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणी मारहाणीच्या कलमांखाली चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, अशी विचारणा केली असता पोलिसांनी सांगतले की, सदर महिला तिच्या माजी पतीच्या घरातून गेली आणि माजी पतीचे कुटुंबीय तिला त्वरित घेऊन आले. तर पीडित महिलेचा दावा आहे की, ती तिच्या दुसऱ्या पतीसोबत एक महिन्यापासून राहत होती. या महिलेचा दुसरा पती मजुरीसाठी घराबाहेर असताना हा सगळा प्रकार घडला.

Read in English

Web Title: Shocking! brother in Law Sitting on the woman's shoulder & Forced her to walk 3 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.