शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

लग्नासाठी केलं 'सेक्स चेंज ऑपरेशन', पण प्रियकराने दिला धोका; प्रकरण पोलिसात गेलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 3:29 PM

प्रेम मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही. भारतात एका शहरात चक्क लग्नासाठी एकाने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. पण नंतर जे झालं ते भयानक होते.

Love Story Sex Change Operation: मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका २८ वर्षीय तरुणासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. लग्नासाठी आपल्या जोडीदाराची अट पूर्ण करण्यासाठी त्याने चक्क 'सेक्स चेंज' म्हणजेच लिंग बदलाचे ऑपरेशन केले आणि आता त्याला प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीने सांगितले की, २०२१ मध्ये तो आरोपी वैभव शुक्लाला इंस्टाग्रामवर भेटला. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तक्रारदाराचा आरोप आहे की, लिंगबदलाचे ऑपरेशन केले तरच वैभव आपल्याशी लग्न करेल असे त्याने वचन दिले होते. त्यानुसार फिर्यादीने वैभववर विश्वास ठेवून ऑपरेशन करून घेतले. परंतु, ऑपरेशननंतर वैभवने शब्द फिरवले. एवढेच नाही तर वैभवने फिर्यादीवर बळजबरी केल्याचाही आरोप आहे.

पीडित व्यक्ती म्हणाली, "वैभवने मला लग्नाचे वचन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्याचा हट्ट पुरवला. मी सेक्स अलाइनमेंट ऑपरेशन करून घेतले. परंतु त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला नाही. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने माझ्यावर बळजबरी केली आणि अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार केले."

या फसवणुकीनंतर फिर्यादीने कानपूरमधील विजय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच या कारवाईसाठी झालेल्या मोठ्या खर्चाचा उल्लेख करून वैभववर कठोर कारवाई करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. या प्रकरणाची माहिती देताना विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी चंद्रभाल सिंह यांनी सांगितले की, पीडित आणि आरोपी हे रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर वैभवने लग्न करायचे नसल्याचे सांगून फिर्यादीला धमकी दिल्याचाही आरोप आहे.

चंद्रभाल सिंह पुढे म्हणाले की, आरोपीवर पीडित व्यक्तीसोबत गैरवर्तन केल्याचाही आरोप आहे. आम्ही वैभव शुक्लाविरुद्ध आयपीसी कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपी फरार असला तरी आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीSex Changeलिंगपरिवर्तनsex crimeसेक्स गुन्हाSexual abuseलैंगिक शोषण